महापरिनिर्वाण दिनासाठी नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान 14 विशेष रेल्वे गाड्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २५ नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन स्पेशल रेल्वे गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सहा स्पेशल रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ दादर ते सेवाग्राम /अजनी /नागपूर दरम्यान आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत धावणार आहे.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 01262 अनारक्षित विशेष रेल्वे गाडी नागपूरवरून 4 डिसेंबरला रात्री 11.55 मिनिटांनी सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. 02164 अनारक्षित विशेष रेल्वे गाडी 5 डिसेंबरला सकाळी 8 वाजता नागपूर वरून सुटून त्याच दिवशी 11.45 वाजता मुंबईला पोहोचेल. तसेच 01266 अनारक्षित विशेष रेल्वे गाडी 5 डिसेंबरला नागपूर वरून दुपारी 3.50 वाजता सुटून मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी 10. 55 वाजता पोहोचेल.

हे देखील वाचा : 

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी

 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावे

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

chaityabhoomidr. babasaheb ambedkarMahaparinirwanmumbaiRailways