Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली कोविडची लस

पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरणाला उपस्थित रहावे : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. १० मार्च: जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर कोविड लस घेतली. यावेळी त्यांनी जिल्हयातील पात्र नागरिकांनी कोविड लस न घाबरता टोचून घ्यावी असे आवाहनही केले. लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास कोरोना संसर्ग टाळता येणार आहे. तसेच ही लस अतिशय सुरक्षित व गरजेची असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कोरोना लस घेतल्यानंतर आपण आणि आपल्या कुटुंबासह इतरांना सुरक्षित करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोना लसीकरणानंतर त्यांनी कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक सतिश सोळंके, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, डॉ.मुकुंद ढबाले, डॉ.सुनिल मडावी, डॉ.समीर बनसोडे, डॉ.विनोद देशमुख उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.