Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्याण पूर्व येथे लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई डेस्क दि.१२ मार्च :कल्याण पूर्वेतील ६० फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी,कल्याण पूर्व येथे काल सायंकाळी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती मिळताच ५/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली असता, या विवाह समारंभात सुमारे ७०० लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे अशा प्रकारचे बेजबाबदार पणाचे वर्तन करून कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व, महेश कृष्णा राऊत, कासारवडवली, जि. ठाणे यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ , तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम ११ प्रमाणे एफ .आय आर. दाखल करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे,तरी अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे,सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे (social distancing) या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन महापालिके मार्फत करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.