Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फोनटॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने देवेंद्र फडणवीस घाबरलेत – नवाब मलिक

फडणवीस सिताराम कुंटेवर आरोप करतात हे योग्य नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २६ मार्च – राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला तो नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला आणि त्यावर सिताराम कुंटे यांनी सही केली असा आरोप फडणवीस करत आहेत हे योग्य नाही परंतु आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले असल्याने ते आरोप करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रश्मी शुक्लांचा अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. रश्मी शुक्लाच्या पत्राचा आधार घेऊन दिल्लीत प्रेस घेऊन सरकारवर आरोप करत होते. मुंबईतही प्रेस घेतली व बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे सांगत होते. केंद्रीय गृहसचिवांना व राज्यपालांनाही भेटले. मुंबईत प्रेस घेतली त्यावेळी खुलासा करताना या रश्मी शुक्लाचा रिपोर्ट काय आहे. बेकायदेशीर फोन टॅप केले. रश्मी शुक्लाचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या ते सांगत आहेत. १२ नावे त्यात आहेत. महाराष्ट्र पोलिसमध्ये बदल्या होत राहतात.पोलीस बोर्डच्या अध्यक्षतेखाली होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवाब मलिक यांनी अहवाल फोडला असे फडणवीस बोलत आहेत परंतु गुन्हा दाखल झाल्यावर का घाबरत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

चोरी झाली नाही अशी बोंबाबोंब फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून लोकांना बदनाम करत आहेत. सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.