Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: अखेर उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार निलंबित

Get real time updates directly on you device, subscribe now.

व्याघ्र प्रकल्पाच्या दिवंगत रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना मुंबई मंत्रालयाकडून त्याचे निलंबन करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र वन खात्याकडून निर्गमित करण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. २७ मार्च: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसालच्या दिवंगत रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध धारणीच्या पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे वादग्रस्त विनोद शिवकुमार यांना तडकाफडकी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक या पदावरून दूर केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार

मुंबई मंत्रालयाकडून त्याचे निलंबन करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र वन खात्याकडून निर्गमित करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागचा तात्पुरता प्रभार सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार याच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपवण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. त्या नोट त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती.

उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आत्महत्येस जबाबदार आहेत असे दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे धारणी पोलिसांनी शिवकुमार विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.