Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि.प.अध्यक्षांच्या हस्ते सिलबंद पाणी व ॲलोविरा ज्युस कंपनीचे उद्घाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनआमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ एप्रिल: चामोर्शी तालुक्यातील घोट येथे सुप्रस गृप ऑफ इंडस्ट्रिज अंतर्गत सिलबंद पाणी व ॲलोविरा ज्युस कंपनीचे आज उदघाटन पार पडले. यावेळी सदर कार्यक्रमला उद्घाटक म्हणून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. होळी यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घोट येथे सुमित पोरेड्डीवार यांच्या सुप्रस गृप्स ऑफ इंडस्ट्रिज सिलबंद पाणी व ॲलोविरा ज्युस कंपनीचा आज शुभारंभ पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर विभाग बॅंक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय प्रबंधक संजीव कलवते, गडचिरोल आत्मा प्रकल्प संचालक तथा कृषी विज्ञान केंद सोनापूरचे कार्यक्रम समन्वयक संदिप कराडे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त अभय देशपांडे, घोट पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप रोंढे, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, सरपंच विनय बारसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.टी. गोनाडे, पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.