Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज १४८ नवीन कोरोना बाधित तर ५६ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ६ एप्रिल: जिल्हयात आज १४८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १११९८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०३७८ वर पोहचली. तसेच सद्या ७०२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ११८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६८ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ६.२७ टक्के तर मृत्यू दर १.०५ टक्के झाला.

          नवीन १४८ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ३६,  अहेरी १५, आरमोरी ८, चामोर्शी २२, भामरागड २१, धानोरा तालुक्यातील ६,  एटापल्ली २, कोरची ५, कुरखेडा ७,  मुलचेरा ५, सिरोंचा ७, तर वडसा तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५६ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १७, अहेरी १०, आरमोरी ३, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, एटापल्ली २, कुरखेडा १,  तर वडसा मधील १९ जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील  मेडिकल कॉलनी ३, आलाद नगर कमलबाई मुनघाटे शाळेजवळ १,  डीआयजी ऑफीस २, श्रीनगर वार्ड १, चामोर्शी रोड १, संजय नीखारे यांचे घराजवळ १, शिवाजी कॉलेज जवळ १, वनश्री कॉलनी १,  इंदिरा नगर २, बालाजी नगर चामोर्शी रोड १, गोकूल नगर १, कलेक्टर कॉलनी २ , गांधी वार्ड १, सर्वोदय वार्ड १, नंदन नगर १,   स्थानिक १, जवाहर नेहरु शाळा १, एस. सम्राट १, रामनगर १, अमिर्झा १, भगवानपूर १, कॅम्प एरिया २, बोधली १,   चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये घोट १, कुनघाडा १, तळोधी १, स्थानिक १६, आष्टी ३,  आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये येनगेडा १, स्थानिक ३, रावी १, कालागोटा १, बरर्डी १,  दार्ली १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १०, मेडाडापल्ली १,  लाहेरी ४,  अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ३, नागेपल्ली ६, आलापल्ली ७,  सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ८, गुमालकोडा १, येचली २, नेमाडा २,   धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक ६,  एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये गट्टा १,  कोरची तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक ५, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ३, गोठनगांव १, कासरी १, गुरनोली १, नवरगांव १,  मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये शासकीय माध्यमीक आश्रम शाळा लोहारा  ५,  तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये  नैइनपुर १, गांधी वार्ड ७,  विसोरा १, कुरुड १, सावंगी ३, सहारे दवाखाना जवळ २,  तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये ७ जणांचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय ६७ व खाजगी २ अशा मिळून ६९ बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज २२७४ व दुसरा डोज २९९ नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस ३६३३५ तर दुसरा डोज ९९९६ नागरिकांना देण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.