Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘ब्रेक द चेन’ मार्गदर्शक सूचनाच्या सुधारणे अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात आणखी काही आवश्यक सेवांचा समावेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

चंद्रपूर दि. ६ एप्रिल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना सुधारित करून त्यात राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणखी काही आवश्यक सेवांचा समावेश केला असल्याचे आदेश आज दिले आहेत.  .

अत्यावश्यक सेवेत पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

पेट्रोल पंप व पेट्रोलीयम संबंधीत उत्पादने, सर्व मालवाहक सेवा, डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हीस पुरवठादार/माहिती तंत्रज्ञान सेवांना पुरक/सहाय्यक पायाभुत सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा विषयक सेवा, फळविक्रेते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुढील खाजगी संस्था/आस्थापना आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु राहतील परंतु त्यातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी/कामगार यांनी भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ आपले लसीकरण करुन घ्यावेत व लसीकरण होत नाही तोपर्यंत आरटीपीसीआर निगेटीव्ह चाचणी अहवाल जवळ बाळगावा. सदर प्रमाणपत्र 15 दिवसांकरीता वैध राहील. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासुन लागु होईल. सदर नियमांचे उल्लंघन करणा-यांवर रुपये 1000 /- इतका दंड आकारण्यात येईल.

यात भारतीय प्रतिभुती व विनिमय बोर्ड (सेबी) कार्यालय व सेबीने अधिकृत केलेले स्टॉक एक्सचेंज, डिपॉजीटरी व क्लिअरींग कार्पोरेशन, सेबी अधिकृत मध्यस्थी संस्था, भारतीय रिजर्व बँक व अधिकृत मध्यस्थी संस्था यामध्ये स्टॅण्डअलोन प्रायमरी डिलर्स, सी.सी.आय.एल, एन.पी.सी.आय., पेंमेंट व्यवस्थेशी संबंधीत ऑपरेटर, भारतीय रिजर्व बँक अधिकृत वित्तीय बाजारात सहभाग घेणारे ऑपरेटर्स यांचा समावेश असेल. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिगर बँकींग वित्तीय आस्थापना,  सर्व सुक्ष्म वित्तीय संस्था,  वकीलांचे कार्यालय, कस्टम हाऊस अभिकर्ता/लसी/जिवनाश्यक औषधे/औषध उत्पादने वाहतुकी संबंधीत परवानाधारक वाहतुकदार, रेल्वे/बस/विमानाव्दारे प्रवास करणा-या व्यक्ती ज्यांचे कडे वैध तिकीट असेल त्या प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 किंवा शनिवार व रविवार या कालावधीत विमानतळ/बसस्थानक/रेल्वे स्थानक येथे जाणे-येणे करीता प्रवास करता येईल. औद्योगिक कामगारांना त्यांचे कामाचे वेळेनुसार कामावर जाणे-येणे याकरिता सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 आणि शनिवार व रविवार या कालावधीत खाजगी बस/वाहनांने वैध ओळखपत्रासह प्रवास करण्यास मुभा असेल. धार्मीक स्थळ सर्व नागरीकांकरीता बंद करण्यात आलेली आहे. तथापी, धार्मीक विधींशी संबंधीत व्यक्ती आपली कर्तव्ये बजावू शकतील. अश्या धार्मीक ठिकाणी लग्न/अंत्यविधी यांचे आयोजनास राज्य शासनाकडील दिनांक 04 एप्रिल, 2021 चे आदेशातील नमुद अटी व शर्तीचे अधीन राहुन मुभा असेल. विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 नंतर किंवा शनिवार व रविवार या कालावधीत परिक्षा केंद्रावर जाणे व परत घरी येणे याकरीता वैध प्रवेशपत्रासह प्रवासास मुभा असेल.

शनिवार व रविवार या कालावधीत पुर्व निर्धारीत विवाहांना परवानगी दिली असल्यास संबंधीतांनी  शनिवार व रविवार या संचारबंदीच्या कालावधीत विवाह आयोजीत करण्यासाठी त्या कार्यक्षेत्राचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करावा. उपविभागीय अधिकारी यांनी अश्या पुर्व निर्धारीत विवाहांना राज्य शासनाकडील दिनांक 04 एप्रिल, 2021 चे आदेशातील नमुद अटी व शर्तीनुसार आयोजीत विवाहास परवानगी द्यावी. घरकाम सहाय्यक/वाहन चालक/स्वयंपाकी यांना सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 नंतर आणि शनिवार व रविवार या कालावधीत कामावर जाणे-येणे याकरिता संबंधीत घरकाम सहाय्यक/वाहन चालक/स्वयंपाकी यांनी महानगरपालीका क्षेत्रांसाठी आयुक्त, महानगर पालीका, नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्रासाठी मुख्याधिकारी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी तहसिलदार यांचेकडे अर्ज करावा. संबंधीत प्राधिकृत अधिकारी यांनी अर्जाची शहानिशा करुन घरकाम सहाय्यक/वाहन चालक/स्वयंपाकी यांना ओळखपत्र वितरीत करावे. 

        सदर आदेशाची अंमलबजावणी संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात दिनांक 05 एप्रिल चे रात्री 08.00 वाजेपासुन ते दिनांक 30 एप्रिल 2021 चे रात्री 11.59 वाजेपर्यंत लागु राहील, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.