Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माझा आणि सचिन वाझेंचा कधीच संबंध आला नाही: अजित पवारांचा खुलासा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ८ एप्रिल: लेटर बॉम्ब नंतर अजित पवारांनी पंढरपुर मध्ये खुलासा केला ते म्हणाले माझा आणि सचिन वाझेंचा कधीच संबंध आला नाही चौकशीत सत्य समोर येईल .

पंढरपुर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकच्या निमित्ताने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुर आले आहेत.यावेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.तर यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं म्हणत त्या कार्यकर्त्याला झापतास एकच हशा पिकला

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस”

परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते.
“लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या असंही अजित पवार म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तुला घालायची तेथे घाला भाजपा नेत्यांवर टीका करताना अजित पवारांची जीभ घसरली

“कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपमध्ये कल्याणरावचे कल्याण झाले का? आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करायला लागल्यावर घरी चकरा मारायला लागले म्हणतआ रे तुला कुठे घालायची तेथे घाल ना कल्याणराव ची आता आठवण। झाली साहेबांकडे जाताना आता का त्यांना पुळका आला आहे, हे आपल्याला माहीत आहे. म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर जहरी टीका केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.एक पोलीस अधिकारी खराब असेल तर सर्व पोलीस खाते खराब नसते. हे तीन पक्ष एकत्र आल्याने काही जनांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे

वाझे प्रकरणात चौकशी निपक्षपाती पणाने झाली पाहिजे अशी आमची भावना आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.