Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर: कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करणार, अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांची चेतावणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. ८ एप्रिल: कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी औषध साठा, मनुष्यबळ इत्यादीसह ज्या-ज्या सुविधा आवश्यक आहे, त्याची तात्काळ मागणी करावी. जिल्हा प्रशासनाद्वारे आपल्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात येईल, मात्र कोरोना रूग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्ण व्यवस्थापनाच्या कामात कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत दिला.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. प्रशांत साठे, डॉ. संदीप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सीजन बेड, प्रतिबंधित क्षेत्र, ब्रेक द चैन अंतर्गत सूचनांचे पालन, आरटीपिसिआर चाचण्या व कोरोना लसीकरणाबाबत माहिती घेऊन संबंधितांना दिशानिर्देश दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.