Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरकारच्या निष्काळजीपणाने किनवट आगारातील कर्मचारी सुरेंद्र सावतेंचा कोरोनाने मृत्यु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड 10 एप्रिल:- नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका या-ना-त्या कारणाने रोज चर्चेचा विषय बनलाय.तालुक्याच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कोरोनो रुग्णांची हालाकिची परिस्थिती आणि निकृष्ट दर्जाचे जेवण याची काही वृत्तवाहिण्यांनी काल दखल घेतली. आणि आज किनवटच्या बस डेपोतील भयावह वास्तव समोर आले आहे. डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी,पोलिस अशी अणेक सरकारी कर्मचाऱ्यांप्रमानेच एस टी खात्यातील कर्मचाऱ्यांचाही फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश होतो.

सरकारने सर्व फ्रंटलाईन वर्कर्सना कोवीड लस उपलब्ध करुन दिली मात्र किनवटच्या एस टी डेपोतील एकाही कर्मचाऱ्याला आजवर कोरोनाची लस दिली गेली नाही. थकलेले पगार आणि कोणत्याही सुरक्षेविणा डेपोतील कर्मचारी आपला जिव मुठीत घेऊन काम करतायत. मात्र सरकारचे याकडे यपशेल दुर्लक्ष होत आहे. आणि या अशा परिस्थितीत किनवट आगारातील कर्मचारी सुरेंद्र लक्ष्मन सावते यांचा कोरोनाने मृत्यु झालाय. सुरेंद्र यांच्या मृत्युला कुणाला जबाबदार ठरवायच असा सवाल येथिल कर्मचारी विचारत असतानाच यानंतरही एस ची कोणत्याही सुरक्षेविना आपला जिव मुठीत घेऊन कर्मचाऱ्यांनी काम करतच रहायच का प्रशासन यावर काही ठोस पाऊल उचलणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.