Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विकेंड लॉकडाऊनला आवळगाव वासियांचा १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रम्हपुरी, दि. १० एप्रिल: वाचलो- जगलो तर माझ्या नातवा पळ-नातवाचे तोंड पाहीन या इच्छेपोटी. साथीच्या रोगात लवकर मरण्यापेक्षा शासनाने ठरवून दिलेली नियमावली, मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करून  जास्तीत जास्त दिर्घ आयुष्य जगता येईल या अपेक्षेने काटेकोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा निश्चय आवळगाव वासीय जनतेने केला आहे. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरातील ग्रामपंचायत चौकात पाच-पन्नास लोकांनी गजबजलेला चौक आज ओसाड वाटत आहे.

नुकतेच नवनियुक्त सरपंच भास्कर रावजी बानबले व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी जनतेला केलेल्या आव्हानानुसार आवळगाव येथिल पानठेल्या पासून तर मोठ्या दुकाना पर्यंतच्या दुकानदारांनी शनिवार, रविवार दोन दिवस आपापली दुकाने बंद ठेवून घराबाहेर न पडण्याचा संकल्प केला आहे व ग्रामपंचायत आव्हाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.