Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाचं काम दळभद्री केलं – शिवसेना खा. विनायक राऊत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ११ एप्रिल: चिपी विमानतळाच्या रखडलेल्या कामा वरून शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दुर्दैवाने कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी दळभद्री त्यांनी आयआरबी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी अशा प्रकारचा कोंट्रक्टर नियुक्त केला. तेच काम एमआयडीसीने केलं असतं तर शिर्डी सारखा विमानतळ सुरू झाला असता माञ आयआरबीचे लाड पुरवण्यासाठी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि संपूर्ण विमानतळाची वाट लावण्याचं काम केलं. आता मागे लागून ते काम आम्ही पुर्ण करून घेतोय. डिजीसीएच्या सुचने प्रमाणे रनवेचं काम झालं नाही म्हणून त्याला डिजीसीएने लायसन दिलं नाही माञ आता आयारबीला शेवटची वार्निंग दिलेली आहे. आता जर डिजीसीएच्या सुचनेप्रमाणे रनवेचं काम झालं नाही तर एमआयडीसीला चिपी विमानतळ आपल्या ताब्यात घेण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही माञ कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड केली जाणार नसल्याचं म्हणत आयआरबीला शेवटचा इशाराच खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.