Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गळा आवळून निर्घृण हत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, १२ एप्रिल: एका ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी ३० वर्षीय आरोपीने संधी साधून या चिमुरडीला आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संबंधित मुलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. यानंतर काही स्थानिक लोकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडलं आणि बेदम चोप दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील आहे. येथील एका गावातील ५ वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यावेळी पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने तिच्यावर अमानुष बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीनं तिचा गळा आवळून हत्या केली. त्याचवेळी शेतीच्या दिशेनं जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी संबंधित प्रकार पाहिला. पीडित मुलगीही मृतावस्थेत तिथेच पडली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे गावकऱ्यांनी ३० वर्षीय आरोपी युवकाला रंगेहाथ पकडलं आणि बेदम चोप दिला. दरम्यान गावातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी युवकाला ताब्यात घेतलं. गावातील लोकांचा आक्रोश पाहाता पोलिसांनी त्वरित पीडित मुलीचा मृतदेह घटनास्थळावरून हलवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.