Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर अनिल देशमुख यांना CBI कडून समन्स, १४ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, १२ एप्रिल : माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या पत्रामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सीबीआयच्या (CBI) चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांना १४ एप्रिल रोजी चौकशीला बोलावले आहे.

परमबीर सिंग यांनी मुंबईतील बार, रेस्टारंट आणि पबचालकांकडून १०० कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी हायकोर्टाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने पोलीस अधिकारी वकील जयश्री पाटील, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची चौकशी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर लागला आहे. अनिल देशमुख यांना १४ एप्रिल रोजी चौकशीला बोलावण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याआधी  सीबीआयने रविवारी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना चौकशी करता बोलावले होते. असं सांगितलं जातंय की, अनिल देशमुख यांचे हे दोन्ही सचिव मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील आणि एपीआय सचिन वाझे या तिघांना वारंवार भेटायचे. एवढंच नाही तर बार, हुक्का पार्लर सारख्या आस्थपनांकडून पैसे गोळ्या करण्या संदर्भात या दोन्ही सचिवांनी या तिन्ही पोलिसांशी अनेकदा चर्चा केली.

त्यामुळे नेमके अनिल देशमुख यांचे पीए (स्वीय सहाय्यक) या पोलिसांना वारंवार का भेटायचे? तसंच यांच्यात काय चर्चा होत होती? माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानुसार तसंच सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, या सचिवांनी नेमकी काय भुमिका बजावली, याची शाहनिशा सीबीआय या दोघांकडून करत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सीबीआयने आतापर्यंत तक्रारदार जयश्री पाटील, प्रतिवादी परमबीर सिंग, एसीपी संजय पाटील, सचिन वाझे, आणि हॉ़टेल व्यावसायिक महेश शेट्टी यांची चौकशी केली. तर आज सीबीआयने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांची चौकशी केल्याने पुढचा नंबर अनिल देशमुख यांचा लागला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.