Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचा रुग्णालयाला व्हेंटिलेटर व डायलिसिस युनिट उपलब्ध करून देणार: खा. अशोक नेते यांची ग्वाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • खासदार अशोक नेते यांनी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाची केली पाहणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा दि. १३ एप्रिल: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आज सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान सिरोंचा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली व रुग्णालयाची पाहणी केली तसेच रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व रुग्णालयात असलेल्या औषधसाठा तथा यंत्रसामुर्गी बाबतची माहिती जाणून घेतली असता रुग्णालयात व्हेंटिलेटर व डायलिसीस युनिट नसल्याचे लक्षात आले. याची दखल घेऊन खा. अशोक नेते वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लवकरच सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर व डायलिसीस युनिट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

    याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, ज्येष्ठ नेते दामोदरजी अरगेला, राज्य परिषद सदस्य सत्यनारायण मंचेरलावार,  तहसीलदार सय्यद हमीद, नगर पंचायतीचे  मुख्याधिकारी विश्वास पाटिल, भाजपचे तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, माधवजी कासारलावार,  ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कन्नाके, डॉ शशिकला, डॉ महेंदर पेद्दाला, राजेश संतोषवार, तिरुपती बेडके, संदीप दागम उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.