Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन…! दुचाकी जाताच कोसळला पूल; युवक झाला जखमी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही.
  • फुंडे, शेवा मार्गामधील एमएसईबी कॉलनी मागील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रायगड, दि. १४ एप्रिल: रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील फुंडे गावाजवळ असलेल्या फुंडे, शेवा मार्गामधील एमएसईबी कॉलनीच्या मागील पूल कोसळून डाऊर नगर चा दिपक कासुकर हा युवक जखमी  झाला आहे त्याला जेएनपीटी दवाखान्यात नेण्यात आले आहे.

पूल कोसळला त्यावेळी दिपक कासुकर हा युवक आपल्या मोटर सायकल वर जात होता व तो त्यात अडकला व जखमी झाला. त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या व दोन्ही बाजूच्या गाड्या त्वरित थांबविण्यात आल्या व त्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टळला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नित्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच हा पूल कोसळला असून या पुलाच्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना  त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.