Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्यूसह आज ५२४ नवीन कोरोना बाधित तर २२६ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १८ एप्रिल: आज जिल्हयात ५२४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २२६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १५००९ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ११६९२ वर पोहचली. तसेच सद्या ३१०४ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण २१३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १३ नवीन मृत्यूमध्ये रा. नवेगाव  गडचिरेाली येथील ७२ वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील ५० वर्षीय महिला, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील ५८ वर्षीय पुरुष, रा. रामनगर गडचिरोली येथील ५२ वर्षीय पुरुष, ता. लाखांदुर जि. भंडारा येथील ५८ वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील ६२ वर्षीय पुरुष, रा. स्नेहानगर, गडचिरोली येथील ५० वर्षीय महिला, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील ६९ वर्षीय पुरुष, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील ६२ वर्षीय पुरुष, ता. कोरची जि. गडचिरोली येथील ४५ वर्षीय पुरुष, ता. पवनी जि. भंडारा येथील ६५ वर्षीय पुरुष, रा. सर्वोदय वार्ड गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील ५७ वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.९० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २०.६८ टक्के तर मृत्यू दर १.४२ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

          नवीन ५२४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६९, अहेरी तालुक्यातील ३४, आरमोरी ३८, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील ३०, धानोरा तालुक्यातील २७, एटापल्ली तालुक्यातील १६, कोरची तालुक्यातील ३०, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ३९, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये १४, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ३० तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ८८ जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या २२६ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ११४, अहेरी ११,  आरमोरी १६, भामरागड १७, चामोर्शी १५, धानोरा ५, एटापल्ली ९, मुलचेरा ३, सिरोंचा १, कोरची ११, कुरखेडा १३, तसेच वडसा येथील ११  जणांचा समावेश आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.