Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राम नवमी साजरी करण्यासाठी सरकारकडून नवी नियमावली जारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • शासनाने दिल्या ५ महत्त्वपूर्ण सूचना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २० एप्रिल : राज्यभरात कोरोनाने धारण केलेलं रौद्र रुप शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी लवकरात लवकर तोडण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लादण्यात आलेले असतानाच आता श्रीरामनवमीसाठीही नवी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रामनवमी उत्सव साजरा करताना सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

शासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१. श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोव्हिड-१९  चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी हा उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

२. दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजेसाठी जाता येणार नाही. तसंच मंदिरात भजन, किर्तन किंवा इतर कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.

३. मंदिराचे व्यवस्थापक/ विश्वस्त यांनी शक्य असेल तर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी.

४. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

५. कोव्हिड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या इतर निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.