Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयसीसीने 8 दिवसांत 3 खेळाडूंवर लावली 5 वर्षांसाठी बंदी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 22 एप्रिल:- IPLचा चौदावा हंगाम ऐन रंगात आला असताना क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणखी एका खेळाडूवर बंदी आणली आहे. बुधवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) एका खेळाडूवर बंदी लावण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये ICCने तीन खेळाडूंवर बंदी घातली आहे. UAEचा खेळाडू कागिर खानवर आता 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू दिलहारा लोकुहेतिगे या दोघांवरही बंदी घालण्यात आली होती. 3 एप्रिल 2019 रोजी लोकुहेतिगे याला तात्पुरते निलंबित करण्यात आलं होतं.स्ट्रीकवर 14 तर लोकुहेतिगेवर 19 एप्रिलपासून बंदी लावण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर 5 वर्षे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही क्रिकेटच्या सामन्यात तो 5 वर्ष खेळू शकत नाही. त्याशिवाय मेहरदीप छायाकर यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे 6 आरोप लावण्यात आले आहेत.  कादिर खानवर 2019 मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. ICCने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर 2019 पासून त्याच्यावर या आरोपांचा परिणाम झाला होता. त्याला निलंबित देखील करण्यात आलं होतं. कादिरनं काही आरोप मान्य केले आहेत. एप्रिल 2019मध्ये  झिम्बाम्बे आणि यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातील महत्त्वपूर्ण माहिती कादिरकडे होती. ज्याचा उपयोग सट्टाबाजीत होऊ शकतो. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.