Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात 19 मृत्यूसह आज 417 नवीन कोरोना बाधित तर 354 कोरोनामुक्त

जिल्हयात एकुण 280 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 22 एप्रिल:- आज जिल्हयात 417 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 354 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 16936 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12773 वर पोहचली. तसेच सद्या 3883 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 280 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज 19 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय महिला अहेरी, 63 वर्षीय पुरुष कुरखेडा , 63 वर्षीय पुरुष आरमोरी, 27 वर्षीय पुरुष वडसा, 70 वर्षीय महिला पुराडा कुरखेडा, 52 वर्षीय महिला लाझेंडा गडचिरोली, 57 वर्षीय महिला गणेश कॅलोनी गडचिरोली , 55 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी , 66 वर्षीय पुरुष विदर्भ नगर ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,65 वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा , 57 वर्षीय पुरुष ता.मुल जि.चंद्रपूर , 48 वर्षीय पुरुष राजेन्द्र वार्ड वडसा, 43 वर्षीय पुरुष सुंदरनगर ता.मुलचेरा, 30 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 50 वर्षीय पुरुष ता.कुरखेडा, 60 वर्षीय महिला ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,46 वर्षीय महिला सिंधीं कॅलोनी वडसा,46 वर्षीय पुरुष चामोर्शी ,75 वर्षीय महीला बर्डी आरमोरी जि. गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.93 टक्के तर मृत्यू दर 1.65 टक्के झाला.

नवीन 417 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 183, अहेरी तालुक्यातील 40, आरमोरी 28, भामरागड तालुक्यातील 10, चामोर्शी तालुक्यातील 16, धानोरा तालुक्यातील 23, एटापल्ली तालुक्यातील 20, कोरची तालुक्यातील 27, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 11, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 12, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 38जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 354 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 140, अहेरी 21, आरमोरी 20, भामरागड 19, चामोर्शी 19, धानोरा 26 , एटापल्ली 10, मुलचेरा 04, सिरोंचा 35, कोरची 11, कुरखेडा 20, तसेच वडसा येथील 29 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.