कल्लेड जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीतील मृत्यूंच्या दंडाधिकारीय चौकशी बाबत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २३ एप्रिल: मौजा-कल्लेड जंगल परिसरात, दिनांक ६ डिसेंबर, २०१७ रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना मौजा – कल्लेड जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन पुरुष व पाच महिला असे (सात) ७ अनोळखी ईसम गोळीबारात ठार झाले होते. अनोळखी नक्षल महिलेच्या मृतदेहाची छायाचित्राद्वारे आत्मसमर्पित नक्षल महिलेकडून ओळख पटविण्यात आली असून तिचे नाव विमला असे असल्याचे समोर आले आहे. पंरतू सदर महिलेचे मुळ नाव व पत्ता माहिती झाले नाही. ती तेलगू भाषिक असून तिच्याबद्दल अधिक माहिती मिळणेबाबत आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम, १४४ व १७६ अन्वये मृत्युच्या कारणांची दंडाधिकारीय चौकशी करुन अहवाल सादर करणेस आदेशीत केले आहे. अनोळखी मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, उप विभागीय दंडाधिकारी, अहेरी हयांचे न्यायालयात सुरु आहे. तरी वरिल घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहे, प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे, त्यांनी दिनांक ९ मे २०२१ पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी हयाचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत दाखल करावे. असे उपविभागीय दंडाधिकारी, राहुल गुप्ता (भा.प्र.से.) अहेरी यांनी कळविले आहे.


Comments are closed.