Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले.
  • क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २३ एप्रिल: पोलँड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत माझी नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे अशा शब्दात कौतुक करून ,अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्री सुनील केदार म्हणाले, अल्फियाला शासनाकडून ३ लाख रोख रक्कम पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना  विभागाला दिले आहेत. तसेच भावी स्पर्धांच्या सरावासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे.

अल्फिया पठाणने गुरुवारी पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली.

ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मधे आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने ५-० अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.

१८ वर्षाच्या अल्फिया ने सुरूवाती पासूनच आक्रमण केले व प्रतिस्पर्धीला सावरुच दिले नाही.

उंच व मजबूत शरिरयष्टीच्या अल्फियाने पंचेस चा वर्षाव करित तीनही फेऱ्या मधे आपले तांत्रिक कौशल्य व शक्ती पणाला लावून आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.