Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: नक्षल्यांनी केली रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ एप्रिल: अहेरी तालुक्यात येत आलापल्ली-भामरागड महामार्गावर असलेल्या मेडपल्ली ते तुमीरकसा येथे ६ किमी अंतराचे रस्ता बांधकामाचे काम सुरु होते. काल रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास १५ ते २० नक्षल्यांनी कामाच्या ठिकाणी येऊन बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर नक्षली बॅनर लावून कामावरील मजुरांना धमकावून गेल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मेडपल्ली ते तुमीरकसा ६ किमी अंतराचे रस्ता बांधकामाचे काम छत्तीसगड येथील श्यामल मंडल कंत्राटदार यांच्या द्वारे सुरु होते. रस्त्याच्या बांधकामासाठी मुरूम लागत असल्याने कंत्राटदारानी भाडे तत्वावर जाळपोळीच्या एक दिवसाआधीच ट्रॅक्टर व इतर वाहने बोलावली होती. ती मेडपल्ली गावातच रस्त्यालगत उभी होती. आणि त्याच वाहनाला नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

या रस्ता बांधकामाचे काम काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र अचानक रात्री नक्षल येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण व धमकी देऊन ट्रॅक्टर, पाण्याची टँकर आणि ब्लेड ट्रॅक्टर या वाहनांना आग लावुन जाळण्यात आले आहेत. अचानक पुन्हा नक्षल्यांनी डोके वर काढले असुन पुन्हा जाळपोळ केल्याने ग्रामीण परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षल्यांनी २६ एप्रिल रोजी भारत बंद ची दिली हाक

समाधान नावाने सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतीकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या प्रहार दमन अभियानाच्या विरोधात एप्रिल २०२१ महिनाभर प्रचार आणि जन आंदोलन उभे करून २६ एप्रिल ला या दमन मोहिमेच्या विरोधात भारत बंद करा अशी हाक बॅनरद्वारे देण्यात आली आहे. याशिवाय नक्षल चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी युवक युवतींनो नवजनवादी भारत निर्माण करण्याकरिता पीएलजीआर मध्ये भर्ती व्हा! असे आवाहन करण्यात येऊन पेरमिली एरिया कमेटी, भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असे बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.