Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २८ एप्रिल: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खा. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र. आज सकाळी १०.०० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जायंट किलर ठरले

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.