Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा – खा. अशोक नेते यांचे निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • अहेरी तालुक्यातील कोविड स्थितीचा खासदार अशोक नेते यांनी घेतला आढावा.
  • ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन व मिनी व्हेंटिलेटर पुरविण्याचे आश्वासन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २९ एप्रिल: गडचिरोली जिल्ह्यात कोविड बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे अहेरी तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी दुर्गम भागात को-वैक्सिनचे लसीकरण मोठया प्रमाणात करणे आवश्यक असून ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर व शिक्षकांच्या माध्यमातून गावांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना लसीकरणाची माहिती देऊन त्यांना प्रवृत्त करण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असून बाधीत रुग्णांना योग्य औषधोपचार करून कोरोना वर मात करण्याचे निर्देशही खा. अशोक नेते यांनी दिले. तहसील कार्यालय अहेरीच्या सभागृहात अहेरी तालुक्यातील कोविड स्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना ते बोलत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आढावा बैठकिला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, अहेरी तालुका महामंत्री पोशालु चूधरी, महिला आघाडीच्या रहिमा सिद्धीकी, पौर्णिमा इष्टाम, तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधीक्षक, नगर पंचायत चे मुख्याधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. अशोक नेते यांनी आढावा घेतला असता कोविड बाधीत २८९ रुग्ण असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार ओतारी यांनी सांगितले तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगितले असता खा. अशोक नेते यांनी औषधी साठी वरिष्ठांना सूचना देणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ऑक्सिजन कन्सटेटर मशीन व मिनी व्हेंटिलेटर अहेरी तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व कोरोना बाधीत व कारंटाईन रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी खा. अशोक नेते यांनी दिले. बैठकीला अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.