Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर येथील महेंद्र अधिकारी यांचं अकस्मात निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

जनसामान्यांचा पाठीराखा आणि उमदे नेतृत्व हरपले.!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 पालघर दि.२९ एप्रिल : तालुक्यातील नागझरी गावचे रहिवासी असलेले आणि आपल्या कर्तृत्वाने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच, सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे उद्योजक श्री महेंद्र रत्नाकर अधिकारी यांचे आज अकस्मात दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मुंबईतील एका खासगी रुग्णलयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महेंद्र अधिकारी यांनी पदार्पणातच सामाजिक आणि राजकीय व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी करत केवळ आपल्या कुणबी समाजापुरते न राहता गरीब, आदिवासी, कष्टकरी शेतकरी अशा सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, आदिवासींच्या जमिनींचे किंवा इतर प्रश्न किंवा व्यावसायिकांचे प्रश्न असोत महेंद्र अधिकारी सदैव पीडितांच्या बाजूने खंबीर उभे राहत असत. तसेच सहकार, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे मोलाचे कार्य होते. त्यांच्या विनयशील आणि अजातशत्रू स्वभावामुळे जनसामान्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळेच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या गर्दीतही अपक्ष उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना पालघर पंचायत समिती सदस्य म्हणून बहुमताने निवडून दिले. तसेच महेंद्र अधिकारी यांनी अनेक महत्वाच्या पदांचां कार्यभार अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून त्या पदांची प्रतिष्ठा वाढवली.

स्वर्गीय महेंद्र अधिकारी हे पालघर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते, तसेच या आगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघरचे माजी अध्यक्ष, तसेच अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांमधून कार्यरत होते. कोणाही गरजूला अडचणीत नेहमी मदतीचा हात देणारा अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक जण रिकाम्या हाताने कधीच परत येत नव्हता. तरुणांचे आदर्श असलेले असे हे दानशूर व्यक्तिमत्व वयाच्या ४९ व्या वर्षी अचानक निघून गेल्याने समाज्याचे खूप मोठे आणि कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया येत असून त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, दोन मुलं व भाऊ असा परिवार आहे. महेंद्र अधिकारी यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण पालघर जिल्ह्यातून शोक व्यक्त केला जात आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.