Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्णव गोस्वामीला तूर्त दिलासा नाहीच,पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत सोमवारी होणार सुनावणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. ०७ नोव्हें : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी अर्णव यांच्या वकीलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच कोठडीवर सुनावणी सुरु होण्याअगोदर तिन्ही आरोपींच्या वकीलांनी पोलिसांकडे दाखल केलेली पोलीस कोठडीसाठी रिवीजन कॉपी इंग्रजीमध्ये अनुवाद करुन कोर्टाकडे मागितली.

त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. आरोपींचे तिन्ही वकील हे मराठी आहेत. या अगोदर कोर्टाचे सर्व कामकाजाचे पेपर मराठीमध्ये झाले आहे. त्यावर आरोपीच्या वकीलांनी मुख्य न्यायदडांधिकारी कोर्टात युक्तीवाद केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अलिबाग सत्र न्यायालयाचे कामकाज हे मराठीमध्येच चालते. त्यामुळे आरोपीकडून इंग्रजी कॉपीची केलेली मागणी हा निव्वळ टाईमपास आहे. त्यामुळे आरोपीच्या वकीलांची मागणी फेटाळण्यात यावी, असे सांगत सत्र न्यायाधीश आर जे मल्लशेट्टी यांच्या कोर्टाने इग्रंजीमध्ये अनुवादाची ही मागणी फेटाळून लावली.

त्यानतंर आरोपींच्या वकीलांकडून हायकोर्टात काही विषयांवर सुनावणी चालू असल्याचे पेपरवर्क सादर करण्यात आले. त्यानुसार पोलीस कोठडीवरील सुनावणी स्थगित करण्यात यावी अशी मागणी आरोपीच्या वकीलांकडून कोर्टाकडे करण्यात आली. त्यावर निर्णय देत कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.

दरम्यान इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना काल (4 नोव्हेंबर) अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना जेलमध्ये न नेता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवलं जाणार आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. यातच त्यांनी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.