बार्टीच्या समतादूत प्रकल्पा मार्फत कोरोना काळात घ्यावयाची काळजी बाबत ऑनलाईन मार्गदर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ”डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या समता दूत पथदर्शी प्रकल्प जिल्हा चंद्रपूरच्या वतीने कोरोना काळात घ्यावयाची काळजी बाबत ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक महामारीच्या कोरोना काळात आपली आणि कुटुंबाची कशाप्रकारे काळजी घ्यावी याविषयावर डॉ. अंकुश गोतावले वैद्यकिय अधिकारी, जिवती यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमास सहभागी श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. डॉ. अंकुश गोतावले यांनी कोरोना काळात घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम आणि सकारात्मक जिवन शैली लसीकरण यांचे महत्त्व सांगीतले. कोरोना काळात संक्रमणाचे लक्षणे आढळल्यास घ्यावयाची काळजी व उपाय यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोना पासून बचाव करायचे असेल तर नेहमी मास्कचा आणि सॅनीटायजर, व्यक्तींमधे अंतर आणि शासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे सांगितले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन बार्टी समतादुत राम मोरे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन पांडे यांनी केले. व कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन संदीप रामटेके, ता. भद्रावती बार्टी समतादुत यांनी केले. कार्यक्रमास दर्शकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समतादुत कृपाली धारणे, समतादुत रजुताई मेंदुलकर, समतादुत लत्ता पोगडपल्लिवार, समतादुत स्वप्नील वंजारी, समतादुत प्रज्ञा राजुरवाडे, रमेश मडावी या सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
हे देखील वाचा :
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी
स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह
अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील


Comments are closed.