Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 1358 कोरोनामुक्त तर 9 मृत्यूसह 895 कोरोनाबाधित

आतापर्यंत 59,976 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,212

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 11 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1358 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 895 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 9 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 73 हजार 314 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 59 हजार 976 झाली आहे. सध्या 12 हजार 212 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 18 हजार 95  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 40 हजार 531 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज मृत झालेल्यामध्ये चिमूर तालुक्यातील किटाळी मक्ता येथील  44 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील 57 वर्षीय महिला. सिंदेवाही तालुक्यातील 81 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील आसेगाव येथील 46 वर्षीय पुरुष. बाळापूर तळोधी येथील 51 वर्षीय पुरुष व पाथरी येथील 35 वर्षीय महिला. तर वणी-यवतमाळ येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1126 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1039 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 35, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज बाधीत आलेल्या 895 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 294 , चंद्रपूर तालुका 94 , बल्लारपूर 62, भद्रावती 24, ब्रम्हपुरी 09, नागभिड 16, सिंदेवाही 17, मूल 14, सावली 07, पोंभूर्णा 47, गोंडपिपरी 52, राजूरा 52, चिमूर 08, वरोरा 95, कोरपना 96, जिवती 01 व इतर ठिकाणच्या 07 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

अखेर सकारात्मक विचारांनी तीन आठवडे कोरोनाशी झुंज देऊन ‘ती’ परतली सुखरूप घरी

Good News:-कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, गेल्या 24 तासात 3.29 लाख नव्या रुग्णांची भर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.