Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क… मोबाईल टॉवर वर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न

घरकुलसाठी युवकाचे टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

आ. संतोष बांगर यांच्या आश्वासने युवक उतरला टॉवरवरून.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगोली : तुर्क पिंपरी येथील अनंतसागर विठ्ठल शिरसाठ हा कुटुंबासह गावात राहतो. त्याने घरकुलाच्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे तगादा लावला. मात्र त्याला अद्यापही घरकुल मिळाले नाही. प्रशासनाकडून घरकुल देण्याचे आश्‍वासनच दिले जात असल्याने अनंतसागर देखील वैतागून गेला होता.

त्यामुळे रागाच्या भरात तो सोमवारी सायंकाळी मोबाईल टॉवरवर चढला. हा प्रकार गावकऱ्यांना कळाल्यानंतर गावकरी तेथे हजर झाले. गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. मला घरकुल मिळाल्या शिवाय खाली उतरणार नाही अन् बळजबरी केली तर आत्महत्या करेल, अशी धमकी देखील दिली. या प्रकारामुळे गावकरी चांगलेच अडचणीत सापडले.

मात्र आ. संतोष बांगर यांनी आश्‍वासन दिले तरच खाली उतरणार असे संबंधित आंदोलक युवकाने  सांगितले. त्यानंतर ही माहिती आ. बांगर यांना कळताच त्यांनी अनंतसागर यांच्याशी व्हिडिओकॉलद्वारे संवाद साधला. त्याचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर अनंतसागर टॉवरवरून खाली उतरला. सुमारे एक तास चाललेल्या या प्रकारानंतर तो खाली उतरल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

हे देखील वाचा : 

टिकेपल्ली येथे वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू, शेतकऱ्यावर लॉकडाउन मध्ये कोसळले संकट

अखेर सकारात्मक विचारांनी तीन आठवडे कोरोनाशी झुंज देऊन ‘ती’ परतली सुखरूप घरी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.