Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांचे तातडीने लसीकरण करा – मंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १२ मे : – राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा व त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे.

मार्च २०२० पासून देशभरात कोविड १९ या विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोविड १९ चा संसर्ग वाढत असताना महाराष्ट्र राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी विनंती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.