Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी १० लिटरचे ५ कॉन्सेन्ट्रेटर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे. यातच काही वेळा रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते. अशावेळी उपयोगी असलेले १० लिटरचे ५ कॉन्सेन्ट्रेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी मदत म्हणून वायुनंदना पावर लिमिटेड, सीएसआर कंपनी म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून देण्यात आले.

आज ५ कॉन्सेन्ट्रेटर कंपनीकडून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, संबंधित कंपनीचे उप महाव्यवस्थापक सीएच व्येंकटराव,  व्यवस्थापकीय संचालक के. बी. खन्ना उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपतकालीन स्थितीमध्ये तसेच रूग्णाची परिस्थिती आचानक खराब झाल्यास ऑक्सिजन पुरवठा नसलेल्या ठिकाणी या कॉन्सेन्ट्रेटर उपकरणाचा फायदा होतो असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले. तसेच सदर ५ कॉन्सेन्ट्रेटर जिल्हयासाठी मदत म्हणून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी कंपनीचे उप महाव्यवस्थापक सीएच व्येंकटराव,  व्यवस्थापकीय संचालक के.बी.खन्ना यांचे आभार मानले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; आरोपी अटकेत

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

गर्भवती मुलीला पाहून डॉक्टरही गरगरले, असं कसं झालं?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.