Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल ५७३ रुग्ण कोरोनामुक्त,191 नवीन कोरोना बाधित तर १६ रुग्णांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,  दि. 14 मे : आज जिल्हयात 191 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 573 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 26826 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 23075 वर पोहचली. तसेच सद्या 3148 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 603 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 16 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 42 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय महिला, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 24 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 25 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 57 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.02 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 11.73 टक्के तर मृत्यू दर 2.25 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Gadchiroli corona

नवीन 191 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 5, आरमोरी 2, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 2, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 13, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 9, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 20 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 573 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 206, अहेरी 65,  आरमोरी 31, भामरागड 6, चामोर्शी 36, धानोरा 18, एटापल्ली 44, मुलचेरा 21, सिरोंचा 32, कोरची 17, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 69 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी १० लिटरचे ५ कॉन्सेन्ट्रेटर

क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; आरोपी अटकेत

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

Comments are closed.