Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नारदा केस : तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सीबीआय ऑफिस बाहेर निदर्शने आणि दगडफेक

टीएमसीच्या चारही नेत्यांच्या जामीनाला स्थगिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोलकाता, दि. १८ मे : नारदा स्टिंग प्रकरणात कलकत्ता हायकोर्टने चारही टीएमसी नेत्यांच्या जामीन आदेशावर स्थगिती दिली आहे. सर्व अटक आरोपींना सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत रहावे लागेल. जामीन याचिकेला विशेष न्यायालयाने मंजूरी दिली होती, परंतु सीबीआयने यास कलकत्ता हायकोर्टमध्ये आव्हान दिले. नारदा स्टिंग प्रकरणात सोमवारी सीबीआयने घेतलेल्या अ‍ॅक्शननंतर बंगालचे राजकारण पुन्हा तापले आहे. मंत्र्यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय ऑफिस बाहेर निदर्शने केली. या दरम्यान स्थिती अनियंत्रित झाली आणि दगडफेक सुरू झाली, ज्यानंतर सुरक्षा दलांनी लाठीचार्ज केला.

सीबीआयने सोमवारी मंत्री फिरहाद हकीम, मंत्री सुब्रत बनर्जी, आमदार मदन मित्रा यांना अटक केली होती. ७ तासांच्या अटकेनंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारही टीमसी नेत्यांना जामीन दिला होता. न्यायमूर्ती अनुपम मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील विशेष सीबीआय न्यायालयाने चारही अटक आरोपींना जामीन दिला होता. यानंतर सीबीआयने कलकत्ता हायकोर्टमध्ये आव्हान दिले. सीबीआय कोर्टमधून जामीन मिळाल्यानंतर फिरहाद हकीम यांची मुलगी शबा हकीमने सोशल मीडियाद्वारे आरोप केला की, जामीन मिळाल्यानंतर सुद्धा फिरहाद हकीम यांना सीबीआयने सोडले नाही. तिने ट्विट करत म्हटले की, जामीनाचा आदेश आल्यानंतर सुद्धा मंत्री फिरहाद हकीम, मंत्री सुब्रत बॅनर्जी, आमदार मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांना अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  : 

पेट्रोल डिझेलमध्ये पुन्हा वाढ.. जाणून घ्या आजची किंमत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा ! भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं

 

 

Comments are closed.