Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 416 कोरोनामुक्त तर 8 जणांचा मृत्यूसह 256 नवीन कोरोना बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 18  मे : आज जिल्हयात 256 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27735 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 24867 वर पोहचली. तसेच सद्या 2230 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Corona Gadchiroli

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 638 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 8 नवीन मृत्यूमध्ये  65 वर्षीय  पुरुष एटापल्ली, 58 वर्षीय  महिला नेताजी नगर गडचिरोली, 70 वर्षीय पुरुष गोठणगांव ता. कुरखेडा, 70 वर्षीय पुरुष वासी ता. कुरखेडा, 49 वर्षीय पुरुष सोनेगांव ता. ब्रम्हपूरी जि. चंद्रपूर, 82 वर्षीय पुरुष अहेरी, 70 वर्षीय पुरुष राजाराम ता. अहेरी, 70 वर्षीय पुरुष एमआयडीसी रोड गडचिरोली, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.66 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.04 टक्के तर मृत्यू दर 2.30 टक्के झाला.

नवीन 256 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 62, अहेरी तालुक्यातील 22, आरमोरी 13, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 65, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 06, कोरची तालुक्यातील 05, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 09, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 28, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 13 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 416 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 130, अहेरी 35,  आरमोरी 23, भामरागड 07, चामोर्शी 40, धानोरा 28, एटापल्ली 25, मुलचेरा 29, सिरोंचा 34, कोरची 04, कुरखेडा 27 तसेच वडसा येथील 34 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

डीआरडीओचे औषध ठरले लाभकारी, ऑक्सीजन सपोर्टच्या रूग्णांसाठी ‘संजीवनी’

पेट्रोल डिझेलमध्ये पुन्हा वाढ.. जाणून घ्या आजची किंमत

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.