Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपाच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नमो भोजन व्यवस्थेची सुरुवात

खा. अशोक नेते यांच्या हस्ते भोजन व्यवस्थेचे उदघाटन. खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजयुमो व अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १८ मे : कोविडच्या या लॉकडाऊन काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक नागरिक हॉटेल्स, नास्ता सेंटर बंद असल्याने उपाशी राहत असत याची जाणीव ठेवत सामाजिक भावनेतून भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने खा. अशोक नेते यांनी भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली शहर व अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून रुग्णाच्या नातेवाईकांना भोजनदान करण्याचा संकल्प केला व काल दि. १७ मे पासून रुग्णालय परिसरात स्टॉल उभारून नमो भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली.

Ashok Nete

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खा. अशोक नेते यांच्या हस्ते फीत कापून नमो भोजन व्यवस्थेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, नगरसेवक तथा शहर महामंत्री केशवजी निंबोड, महामंत्री विनोद देवोजवार, भाजयुमोचे शहर अध्यक्ष सागर कुमरे, सचिव सुहास उप्पलवार, अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष सलीमभाई शेख, महामंत्री इमरान शेख, जिल्हा महामंत्री जावेद अली सय्यद व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Ashok Nete

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नमो भोजन व्यवस्थेच्या माध्यमातून दररोज सकाळी ११ वाजता व सायंकाळी ७ वाजता १५० लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भोजन व्यवस्थेचा रुग्णांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

वाघोली येथील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत

डीआरडीओचे औषध ठरले लाभकारी, ऑक्सीजन सपोर्टच्या रूग्णांसाठी ‘संजीवनी’

 

Comments are closed.