Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जळगाव डेस्क 19 मे:- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते तथा एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील (वय ५४) यांनी त्यांची पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय ४८), मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय २१) यांच्यासह तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलाजवळ घडली असून, ती आज (बुधवारी) सकाळी समोर आली. पाटील कुटुंबीय हे धरणगाव तालुक्यातील भोद येथील रहिवासी होते. तिघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील, पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील व मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील हे तिघे जण टाटा इंडीका (एमएच-१९/एपी-१०९४) गाडीने सोमवारी (दि.१७) सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे श्राध्दाचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी साडेतीन वाजता ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र, ते भोदला पोहचलेच नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, काल (दि. १८) दुपारी ४ वाजता शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलाच्या परिसरात एका पुरुषाचा मृतदेह तापी नदीच्या पाण्यात तरंगताना परिसरातील नागरिकांना दिसला. याच वेळी एक कार बेवारस अवस्थेत पुलावर उभी होती. गाडीचा क्रमांक जळगाव जिल्ह्याच्या पासिंगचा होता. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर विविध ग्रुपमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. जळगाव जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी ही गाडी ओळखल्यानंतर याबाबत धरणगाव तालुक्यात चर्चा सुरू झाली. ही गाडी राजेंद्र पाटील यांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेतकी संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी भोद गावी धाव घेतली. त्यानंतर पुढे धक्कादायक घटनेची माहिती समोर आली.

हे ही वाचा:- अरबी समुद्रात ‘बार्ज P- 305’ वरील रेस्क्यू ऑपरेशन थरार सुरूच

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.