Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. प्रभाकर देव यांची विश्वकोश मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड : डॉ. प्रभाकर देव हे मराठवाडा विद्यापीठातील पहिल्या बॅचचे ते पदवीधर. साठ वर्षापूर्वी  ‘Temples in Marathwada’ ह्या आपल्या प्रबंधासाठी अपुर्‍या साधनानिशी मराठवाड्यातील दुर्गम भागात त्यांनी पायपीट केली.

प्राचीन कलात्मक मंदिरातून देवाचे अस्तित्व शोधायचे नसतो तर निर्जीव दगडातून मानवाच्या कलात्मकतेनं साकारलेलं मंदिरावरील सौंदर्यं हेच देवत्व आहेहे त्यांचे प्रतिपादन.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

   नौकरीच्या निमित्ताने बलभीम कॉलेज बीडहून ते नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात स्थलांतरीत झाले. पुढे इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून निवृत झाले. गेली पन्नास वर्ष नांदेड मधील त्यांचे वास्तव्य भूषणास्पद आहे.

२००८ मध्ये ३०० सालाना गुरुतागद्दीच्या निमित्ताने indian national trust for art culture and heritage ( इन्टँच ) ह्या संस्थेतर्फे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारस्यांच्या नोंदी असलेल्या हेरिटेज नांदेड ह्या ग्रंथाचे तत्कालीन राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटिल यांच्या हस्ते झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकाशनाच्या आठ वर्षापूर्वी कुसुम मधील पालकमंत्री डि.पी.सावंत यांच्या पुढाकाराने  अमृत महोत्सवाचा साकार झालेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 त्या निमित्ताने साकारलेला प्राचीन महाराष्ट्रः परंपरा आणि समृध्दीहि संग्रणीय स्मरणीका. स्वारातीमविद्यापीठातर्फे हैद्राबाद मुक्तिसंग्रमातील योध्यांच्या प्रत्यक्ष  मुलाखतीतून साकारलेले दोन खंड यासह जवळपास डझनभर पुस्तकांचे लेखन देशभरातील विविध परिषदांतून, पुस्तकातून  लिहिलेले संशोधनपर पन्नास एक लेख लिहिण्यात आले आहे.

दरम्यान मराठवाडा इतिहास परिषद, गोदातीर इतिहास संशोधन मंडळ, कुरुंदकर संशोधन केंद्र इ. संस्थाशी आलेला त्यांचा संबध सध्या त्यांनी पहिला ज्ञात ग्रीक प्रवासाच्या पेरिप्लस…ग्रंथाच्या मराठी भाषांतराचा प्रकल्प हाती घेतला आहे. यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची विश्वकोश मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप !: नाना पटोले

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.