Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड लसीकरणात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्लीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला गौरव

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली यांचेकडुन आलापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रास रुपये १० लाखचे आरओ व वाटर एटीएम मंजुर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली :
राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भावमध्ये प्रंचड मोठया प्रमाणात वाढ झाल्याने रुग्ण संख्येमध्ये सर्वत्र प्रंचड वाढ झालेली दिसुन येत होती. मात्र गडचिरोली जिल्हयामध्ये या रोगावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे सध्या कमी प्रमाणात आढळुन येत असलेल्या रुग्ण संख्येवरुन दिसुन येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन शासनाने लसीकरण मोहिम हातात घेतली आहे. याकरीता जिल्हाधिकारी दिपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व आरोग्य विभाग सतत प्रयत्नशिल आहे. सर्व नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे व कोरोनाच्या प्रादुर्भावापासुन सुरक्षीत व्हावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांकडुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे लोक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र आलापली ता. अहेरी येथे मोठया प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आलापल्लीला जिल्हा खनिकर्म निधी या अंतर्गत रुपये दहा लाखाचे आर. ओ. सोबत वाटर एटीएम मंजुर केलेले आहेत. अहेरी तालुक्यामध्ये आलापल्ली मध्ये सर्वाधिक लसीकरण झाल्यामुळे हे मंजुर करण्यात आलेले असुन पुढिल कार्यवाही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग लवकरच पुर्ण करणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्ली गावामध्ये लसीकरण करण्यात आले. एकुण ११८१ लोकांचे लसीकरण झालेले आहे. आलापल्ली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अलका उईके यांच्यासह आरोग्य विभागाच्या चमुने स्थानिक लोकप्रतिनीधींना विश्वासात घेऊन लसीकरण करण्यात आले.

गट विकास अधिकारी किशोर के. गज्जलवार, तहसिलदार ओमकार ओतारी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे, यांचेशी चर्चा करुन ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्या मदतीने गावामध्ये लसीकरण करण्यात आले. या कामाकरीता फरेंद्र आर कुतिरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व लस कमी पडु दिली जाणार नसल्याचे सांगीतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली गावाची लसीकरणाची टक्केवारी जास्त असल्यामुळे  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समाधान व्यक्त केले.

तालुक्यातील ज्या गावांमध्ये जास्त प्रमाणात लसीकरण आहे. अशा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आर. ओ. शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मसेली गावासारखे इतर गावांनी सुध्दा लसीकरण करुन घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा :

मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

धक्कादायक!! प्रेयसीने लग्नासाठी लावला तगादा अन् प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल!

Comments are closed.