Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सलग तिसऱ्या सत्रात सोने चांदीच्या किमतीत वाढ.

Get real time updates directly on you device, subscribe now.

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार जो बायडन यांचा विजय झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज सलग तिसऱ्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क  : दिवाळी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सध्या सोन्याचा भाव ५२४४६ रुपये असून त्यात २७९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीमध्ये ८६९ रुपयांची वाढ झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील पाच दिवसांत कमॉडिटी बाजारात सोने १५०० रुपयांनी वधारले आहेत. आज सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीने तेजीने सुरुवात केली. सोने ०.४५ टक्क्यांनी वधारून ५२४०४ रुपयांवर गेले. ऑगस्ट महिन्यात सोने ५६२०० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ७९१ रुपयांनी वधारला आणि ५१७१७ रुपये झाला. चांदीचा भाव २१४७ रुपयांनी वाढला आणि एक किलोला ६४५७८ रुपये झाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.