Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या

खा. अशोक नेते यांची महामहिम राज्यपालांकडे मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १५ जून : वडसा- गडचिरोली हा नवीन ब्राडगेज रेल्वे मार्ग मंजूर होऊन अनेक वर्षे लोटली मात्र राज्य शासनाने याकरिता आपल्या वाट्यातील ५० टक्के निधी न दिल्याने या मार्गाचे बांधकाम अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणाची कार्यवाही ९० टक्के पूर्ण झालेले आहे. मात्र निधी अभावी हा मार्ग रखडलेला आहे.

गडचिरोली या जिल्हा ठिकाणाला जोडणाऱ्या वडसा- गडचिरोली या ५२ किमी रेल्वे मार्गाचे काम यथाशिग्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाला आपल्या वाट्यातील 50 टक्के निधी देण्याचे निर्देश आपल्या स्तरावर निर्गमित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्याकडे केली. महामहिम राज्यपाल हे नागपूर दौऱ्यावर आले असता खा. अशोक नेते यांनी त्यांची भेट घेतली व रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यपाल महोदयांशी चर्चा करतांना खा. अशोक नेते यांनी सांगितले की, गडचिरोली हा उद्योग विरहीत जिल्हा आहे. जिल्ह्यात रेल्वे चे जाळे नसल्याने उद्योगधंदे होऊ शकले नाही. त्यामुळे रेल्वेचे काम त्वरित सुरू होणे आवश्यक आहे. वडसा- गडचिरोली नवीन ब्राडगेज मार्ग सन २०११ मध्ये मंजूर झाला मात्र वने व पर्यावरण विभागाच्या भु संपादनाच्या अडसरा मुळे निर्माण कार्य सुरू होऊ शकले नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान मूळ किंमती मध्ये वृद्धी होऊन एकूण किंमत १०९६ कोटी रुपये इतकी झालेली आहे. यापैकी ५० टक्के वाटा म्हणजेच ५४८ कोटी रुपये देण्याची हमी राज्य शासनाने २०१६-१७ मध्ये दिली होती. मात्र अजूनही निधी आवटीत केलेला नाही. तसेच वाढीव किंमती नुसार नव्याने स्वीकृतीही राज्य शासनाने दिलेली नाही. असेही खा. अशोक नेते यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या वाट्यातील ५४८ कोटी रुपयांपैकी वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या संकल्पित खर्चाच्या अंदाजानुसार राज्य शासनाने ७७ कोटी रुपयांची तरतूद करणे ब्राडगेज प्रकल्प निर्मिती करिता अनिवार्य आहे. त्यामुळे वडसा- गडचिरोली मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा उचलण्यास नव्याने मंजुरी देऊन चालू वर्षात ७७ कोटींचा निधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनास तसे निर्देश देण्याची मागणी खा. अशोक नेते यांनी महामहिम राज्यपालांकडे केली व रेल्वेचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विंनंती केली.

हे देखील वाचा :

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 43 कोरोनामुक्त, 29 नवीन कोरोना बाधित

आरोग्याच्या पुरेशा सोयीसाठी गडचिरोलीत मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त करा

ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.