Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार

आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने पैसे काढले आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड डेस्क 16 जून :- कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादीत नसून त्याचे पाळेमुळे खोलवर आहेत . या घोटाळयामध्ये शेकापचे इतर नेते सुध्दा भागिदार आहेत . आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ट्राफने पैसे काढण्याचे आल्याच्या इंट्री आमच्या हाती लागल्या आहेत .” असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज दिनांक 16 जून रोजी पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना पाठीशी घातले गेल्याचे सांगत राज्य सरकारकडून टिकास्त्र सोडले . मंगळवारी रात्री ईडीने कर्नाळा बँकेतून मनी लँड्रीग केल्याच्या आरोपावरून माजी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महा विकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आमदार महेश लांडगे यांच्यासह मला विधानसभेच्या पायऱ्यांवर बसावे लागले . त्यावेळी सहकार मंत्र्यांनी भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते . परंतु ते पाळले गेले नाही . राज्य सरकार याबाबत टाळाटाळ करत असल्याचे आमच्या लक्षात आले होते . सुदैवाने पैशांची अफरातफर झाल्याचे ईडीच्या लक्षात आले . त्यानुसार माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाली असल्याचे ” प्रशांत ठाकूर म्हणाले .

” त्यामुळे ठेवीदारांना विश्वास निर्माण झाला आहे . विवेक पाटलांना अटक झाली ती 63 ते 65 खातेदारां पुरते मर्यादित आहे . या पलीकडे जाऊन यामध्ये आणखी गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस येत आहे . शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने 2002 आणि 2005 या कालावधीमध्ये ओव्हर ड्राफ्ट ने पैसे काढण्यात आले आहेत . त्यांचे नाव 63 जणांच्या यादीमध्ये कुठेच नाही .” असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

” आम्ही गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना ओरडून सांगतोय की तुम्ही या प्रकरणी आवाज उठवा . तुमचे कार्यकर्ते मतदार यांच्या पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे . परंतु त्यांच्या नेत्यांनी याबाबत एक चकार शब्द सुद्धा काढला नाही . उलट शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या बॅनरवर आजही विवेक पाटील यांचा फोटो आहे. ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांचे 500 कोटींपेक्षा रुपये हडप केले आहेत. गैरवापर करणाऱ्या विवेक पाटील यांना शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकासआघाडी पाठीशी घालत असल्याचा ” आरोप आ.ठाकूर यांनी केला .
प्रशांत ठाकूर
” या गैरव्यवहारात मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या इतर नेत्यांना सुद्धा लाभ झाला असल्याचे” आ.प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.” विवेक पाटील यांना पाठीशी घालणारे , या गैरव्यवहारांमध्ये भागीदार असणाऱ्यांने याची सखोल चौकशी व्हावी ” अशी मागणी त्यांनी केली.” सीआयडी कडून अटक करण्यास टाळाटाळ कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणाचा तपास सुरवातीला नवी मुंबई पोलिसांकडे होता . परंतु तपास अधिकाऱ्याची हेतुपुरस्सर बदली करण्यात आली . नवी मुंबईच्या तत्कालिन पोलिस आयुक्तांनी हा तपास नाकारला . त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले . गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून तपास यंत्रणा वेगवेगळे कारण देऊन विवेक पाटील यांचे अटक टाळत असल्याचे ” प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

” महा विकास आघाडीचे सरकार असल्याने पोलिस आणि सहकार विभागाकडून कर्नाळा बँकेच्या अध्यक्षांना पाठीशी घातले जात होते” असा आरोपही त्यांनी केला .

Comments are closed.