Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 51 नवीन कोरोना बाधित तर 136 जण कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:.

गडचिरोली, दि.10 नोव्हेंबर: एका मृत्यूसह कोरोनाचे जिल्हयात 51 नवीन बाधित आढळून आले. तर आज 136 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6637 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5870 वर पोहचली. तसेच सद्या 701 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 66 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यू यामध्ये अहेरी तालुक्यातील 30 वर्षीय व्यापारी पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.56 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.

नवीन 51 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 7, आरमोरी 2, भामरागड 4, चामोर्शी 6, धानोरा 0, एटापल्ली 4, कोरची 2, कुरखेडा 1, मुलचेरा 4, सिरोंचा 1 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 136 रूग्णांमध्ये गडचिरोली 52, अहेरी 20, आरमोरी 13, भामरागड 15, चामोर्शी 10, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 3, सिरोंचा 6 कोरची 3, कुरखेडा 7, व वडसा मधील 7 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर 2, रेव्हेन्यु कॉलनी 3, गोकुलनगर 1, विवेकनंदनगर 1, सर्वोदय वार्ड 1, कन्नमवार वार्ड 2, डोंगरे पेट्रोलपंपच्या मागे 1, कॅम्प एरिया 1, पोलीस स्टेशनच्या मागे 1, कनेरी 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 6, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वाघाडा बर्डी 1, शिवनी 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये होदरी 1, टीएचओ कार्यालय 1, धोडराज (पीएस) 1, स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 4, स्थानिक 1, चित्तरंजनपुर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बोदलटंड 1, बेडगाव 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये गुरनूली 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये गोविंदपुर 3, सुंदरनगर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कोरेगाव 2, तुकुम वार्ड 1, आयडीबीआय बँक शाखेजवळ 1, असा समावेश आहे. तसेच इतर राज्यातील 1 व इतर जिल्ह्यामधील यामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.