Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजनाअंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क,दि. 29 जून : घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  व https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे २३ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत १६ एप्रिल २०२१ रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची ही संबंधित मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

हे देखील वाचा  :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.