Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलचेरात उमेद अभियानचे 5 नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन..

100 % कर्मचारी यांच्या कामबंद आंदोलनाला प्रतिसाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली  दि .११ नोव्हें २० :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तालुका मुलचेरा च्या वतीने बेमुदत आंदोलन सर्व कक्षासह काम बंद 5 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे.
सर्व कर्मचार्यांनी काम करणे बंद केले आहे.
स्वयंसहायात समूहाच्या महिलांच्या विरोधानंतरही सरकारने केंद्र पूरस्कृत उमेद अभियानाचे सरकारने खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला.या विरोधात जिल्ह्यातील हजारो समूहा सोबत,प्रेरक व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी ५ नोव्हेंबरपासून कामबंदचा आंदोलनाचा निर्णय घेतला लाखो महिलांनाच आधार असलेल्या उमेद अभियानाचे राज्य सरकारने मागील वर्षभरापासून टप्प्याटप्याने खचिकरन सुरू केला असून,ग्रामीण महिलांना मिळणारे खेडते भांडवल,समुदाय गुंतवणूक निधी हळू हळू निधी देने बंद केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

.त्यांनतर आता कर्मचारी यांच्या सेवा खाजगी कंपनीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे मागील काही वर्षांच्या परिश्रमातून सुरू असलेल्या संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे.महिलांचा संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप नको या मागणीसाठी उमेद कर्मचारी व हजारो महिलांनी मोर्चा सुद्धा काढले.
राज्य शासनाला सदर अभियान सुरू राहण्यासाठी आंदोलन, पत्र व्यवहार करून लक्ष वेधले .
सरकारने दखल न घेतल्याने अभियानातील कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.गुरुवार पासून सुरू झालेल्या आंदोलनास शंभर टक्के महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तालुका मुलचेरा च्या सर्व कर्मचाऱ्या कडून प्रतिसाद मिळाला आहे.दरम्यान ग्रामीण उमेद निर्मिती संस्थांनी कामबंद आंदोलनासोबतच आता विविध स्वरूपाची इतर आंदोलने स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.