Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 7 जुलै : उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एमसीआय) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित  देशमुख यांनी आज दिले.

उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव संजय सुरवसे, आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर  आवश्यक असणारी जमीन ताब्यात घेणे, वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणे याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उस्मानाबाद येथील महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी आणि याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असेही अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणेउस्मानाबाद येथे100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नीत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजे 25 एकर जागा लागणार आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असेही अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

शासनाची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कोयनानगर येथील नियोजित एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राबाबत मुख्यमंत्र्यांकडे होणार सादरीकरण

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.