Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ईद साठी आणलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू; मुंब्र्यात मुसळधार पावसाचा फटका

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे, दि. १९ जुलै : गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी भरत असून याचा फटका जाणसामान्यांना बसत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असून अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. यातच मुंब्र्यातील एका दुर्दैवी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उद्यावर आलेल्या ईदसाठी मोहमद फहाद या व्यापाऱ्याने एकूण २९  बकरे विक्रीसाठी आणले होते. एका गोदामात हे बकरे ठेवले होते व त्यांच्या घाऊक विक्रीचा सौदा देखील काल उशिरा ठरला होता. आज सकाळी ग्राहक येऊन ते बकरे न्यायचे ठरले होते. परंतु पावसाने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे बकरे असलेल्या गोदामात अचानक पाणी शिरले आणि त्यातच एकूण १५  बकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. १४ बकऱ्यांना वाचविण्यात यश आले खरे परंतु मेलेल्या बकऱ्यांमुळे सदर व्यापाऱ्यांचे जवळपास तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मोहम्मद फहाद या व्यापाऱ्याने दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी; धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश -पालकमंत्री आदित्य ठाकरे

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.