Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम, मदतकार्यासाठी आर्मीला पाचारण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. २३ जुलै : कृष्णा आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीने 45 फूट ही धोक्याची पातळी गाठली आहे. तर शहरातील पूर पट्ट्यातील सखल भागातल्या 200 हुन अधिक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर पलूस तालुक्यातील भिलवडी याठिकाणी काही गावात पुराचे पाणी शिरले आहे. तर पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कुटुंबांचे आणि 350 हुन अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळी वाढल्याने जिल्ह्यातील 25 रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. तर वाळवा तालुक्यातील शिरगाव या ठिकाणी गावाला पुराचा वेढा पडला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे शेकडो लोक अडकून आहेत. त्याठिकाणी एनडीआरएफच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तर परिस्थिती गंभीर बनत असल्याने मदतकार्यासाठी आर्मीला देखील जिल्हा प्रशासनाकडून पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सैन्य दलाच्या दोन तुकडया जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे देखील वाचा :

मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा मृत्यू

३० हजार रूपयांची लाच घेतांना तहसीलदारांना रंगेहात केली अटक; एसीबी ची कारवाई

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.