Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृष्णेचे पाणी शिरले बाजारपेठेत, तर वारणा आणि कृष्णाकाठची शेकडो गावेही पाण्याखाली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली २४ जुलै : कृष्णा नदीने अखेर धोक्याची पातळी ओलांडली आहे.४५ फूट धोका पातळी असून सध्या ५० फूट इतकी कृष्णेची पाणी पातळी झाली आहे. त्यामुळे कृष्णेच्या पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. टिळक चौक आणि मारुती चौक याठिकाणी पुराचे पाणी पोहचले आहे.

त्याच बरोबर पूरपट्ट्यातील आणखी भागातील शेकडो घरे पाण्याखाली गेले आहेत. तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेकडो गावेही पाण्याखाली गेले आहेत.संततधार पाऊस कोयना धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगली मध्ये कृष्णा नदीला पूर आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज सकाळी कृष्णा नदीने सांगलीतील धोका पातळी ओलांडली आहे.४५ फूट ही धोका पातळी असून ९:३० वाजता कृष्णेची पाणी पातळी ही ५० फूट पर्यंत पोहचली आहे.तर कृष्णेच्या पुराचे पाणी नागरी वस्ती बरोबर शहरातील बाजारपेठेत शिरले आहे.मगरमछ कॉलनी,दत्त नगर ,काका नगर आणि सूर्यवंशी प्लॉट याठिकाणी असणारे घरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे २५० हुन अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत.

पुराच्या धास्तीने हजारो नागरिकांना स्थलांतर केले आहे. कृष्णेच्या पुराचे पाणी हे शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. टिळक चौक पासून हरभट रोड पर्यत तसेच मारुती चौक पासून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरातील दुकानां पर्यंत पुराचे पाणी येऊन पोहचले आहे.त्यामुळे बाजारपेठेले पुराचा विळखा पडत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याच बरोबर वारणा आणि कृष्णा काठच्या शिराळा, मिरज,पलूस आणि वाळवा तालुक्यातील शेकडो गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील सुमारे ४० हजार हुन हजारो नागरिकांनी २० हजारहुन अधिक जनावरांसह स्थलांतर केले आहे.तर वारणा आणि कृष्णेच्या पुरामुळे नदी काठची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.तर सुमारे ३७ रस्तेही पाण्याखाली गेलं असून मदत कार्यासाठी एनडीआरएफची 3 पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत.तर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ५२ फुटांवर जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.